Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभारतानं अखेर चीनी सैनिकाला आज परत पाठवलं; चुकून केला होता भारतीय हद्दीत...

भारतानं अखेर चीनी सैनिकाला आज परत पाठवलं; चुकून केला होता भारतीय हद्दीत प्रवेश

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्यानं पकडलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकाला आज भारताने पुन्हा चीनकडे सोपवलं. हा चीनी सैनिक ८ जानेवारी रोजी चुकून वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) पार करुन भारतीय हद्दीत आला होता. या सैनिकाला आज (सोमवार) सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पूर्व लडाखमध्ये चुशूल-मोल्दो सीमेवर चीनकडे सोपवण्यात आलं.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक शुक्रवारी सकाळी पूर्व लडाखच्या ‘पँगोंग सो’ या दक्षिणी किनारा क्षेत्रात पकडला गेला होता. तो एलएसीच्या भारतीय हद्दीत आला होता. गेल्या आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे.

अशा परिस्थितीत भारतीय लष्करानं या चीनी सैनिकाला अशा वेळी परत पाठवलं आहे. भारतीय लष्करानं सांगितलं होतं की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक एलएसीवर भारतीय हद्दीत आला होता. यानंतर तिथे तैनात भारतीय सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं की, तो रस्ता भटकल्याने चुकून भारतीय हद्दीत पोहोचला.

चीनी सैन्यानं दिली होती ही माहिती

चीनने त्यांचा एक सैनिक चीन-भारत सीमाभागात रस्ता चुकल्याची माहिती बीजिंगमध्ये दिली होती. पीएलएच्या अधिकृत वेबसाईटमध्ये म्हटलं होतं की, चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक अंधार आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक स्थितीमुळे चीन-भारत सीमेवर शुक्रवारी पहाटे रस्ता चुकला असून यासंदर्भात भारताला माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments