Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभारताच्या ‘अकरा’ विद्यापीठांची जगातल्या शंभर विद्यापीठांमध्ये बाजी!

भारताच्या ‘अकरा’ विद्यापीठांची जगातल्या शंभर विद्यापीठांमध्ये बाजी!

Institute of chemical technology Mumbai

मुंबई : टाईम्स हायर एज्यूकेशनच्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यंदा ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची दुसरी वेळ आहे.

टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने ( बंगळुरु) पहिले स्थान मिळवले होते. दोन पाय-या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले आहे.

ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स स्किममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांमध्ये एक अमृत विश्व विद्यापीठाने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले आहे.

आयआयटी (खरगपूर) २३ पाय-या चढून ३२ वे स्थान मिळवले. तर आयआयटी दिल्लीने २८ पाय-या चढून ३८ वे स्थान मिळवले. आयआयटीने (मद्रास) १२ पाय-यांची प्रगती करुन ६३ वे स्थान मिळवले. आयआयटी (रोपार) आणि इन्स्टियूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (मुंबई) टॉप १०० रँकिंमध्ये आपापल्या पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे ६३ व ७३ वे स्थान मिळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments