Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईइंद्राणीला हवाय पीटर मुखर्जीकडून घटस्फोट, स्पीड पोस्टने पाठवली नोटीस

इंद्राणीला हवाय पीटर मुखर्जीकडून घटस्फोट, स्पीड पोस्टने पाठवली नोटीस

Indrani Mukharee, Peter Mukharijeeमुंबई: शीना बोरा हत्या प्रकरणी कारागृहात बंद असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपला पती पीटर मुखर्जीला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दोघांच्या सहमतीने हा घटस्फोट व्हावा असं तिचं म्हणणं आहे. दोघांवरही शीना बोराच्या हत्येचा आरोप असून खटला सुरु आहे. इंद्राणीने स्पीड पोस्टने पीटर मुखर्जीला आर्थर रोड कारागृहात नोटीस पाठवली आहे. नोटीशीत लिहिल्याप्रमाणे, ८ नोव्हेंबर २००२ रोजी झालेलं हे लग्न आता टिकू शकत नाही आणि सलोखा होण्याचीही कोणती संधी नाही.

इंद्राणीच्या वकिल इडीथ डे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली असून ३० एप्रिलच्या आधी आर्थिक सेटलमेंट करण्यात यावी अशी विनंती केली आहे, जेणेकरुन कोणतेही आरोप न होता विभक्त होता येईल. नोटीशीत म्हणण्यात आल्याप्रमाणे, एकदा घटस्फोट आणि आर्थिक सेटलमेंट झाल्यानंतर घटस्फोटानंतर कोणीही दुसऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणार नाही तसंच आयुष्यात ढवळाढवळही करणार नाही

याआधी इंद्राणीने १७ जानेवारी २०१७ ला घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आपण न्यायालयीन कोठडीत असल्याने घटस्फोट घेऊ शकतो का अशी विचारणाही तिने न्यायालयात केली होती. यावेळी न्यायालयाने ही तुमची खासगी बाब असल्या कारणाने न्यायालयाच्या परवानगीविना निर्णय घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र इंद्राणीने घटस्फोटासाठी काहीच हालचाल केली नव्हती.

शीना बोरा हत्या प्रकरणी ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणी मुखर्जीला तिचा पहिला पती संजीव खन्ना याच्यासहित अटक करण्यात आली होती. एप्रिल २०१२ मध्येच शीनाची हत्या झाली होती. मात्र ड्रायव्हर श्याम राय याने कबुली दिल्यानंतर ही हत्या उघडकीस आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments