होम महाराष्ट्र मुंबई मेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला

मेट्रोचे काम सुरु असताना लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला

20
0

मुंबई:  मालाड पश्चिम लिंक रोड येथे मेट्रो २चे काम सुरू असताना पिलरचा लोखंडी सळयांचा सांगाडा कोसळला आहे. मालाड पश्चिम लिंक रोडवर दहिसर ते वर्सोवा याठिकणी दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सतत वाहतुकीने गजबजलेल्या मालाड-लिंक रोडवर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. या मार्गावर सतत दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. मुंबईत मेट्रोच्या पिलरच्या सळयाचा सांगाडा कोसळण्याची ही तीसरी घटना आहे.

मागील काही दिवसांपासून मेट्रोच्या पिलरचा सांगाडा कोसळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत मेट्रो ७ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना २०१७ मध्ये जोगेश्वरीतील शंकरवाडी बसस्टॉपजवळ पिलरचा लोखडी सांगाडा कोसळण्याची घटना घडली होती. तर दुसरी घटना ही गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील गोरेगाव चेकनाक्याजवळ घटना घडली होती. या घटनेत दोन कामगार जखमी झाले होते.