Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजनजावेद अख्तर म्हणाले, ती शायरी हिंदूविरोधी म्हणणं हास्यास्पद

जावेद अख्तर म्हणाले, ती शायरी हिंदूविरोधी म्हणणं हास्यास्पद

Javed Akhtar,Javed, Akhtarमुंबई : जगसुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या ‘हम देखेंगे लाजिम है की हम भी देखेंगे’ या शायरीवरून जोरदार वाद सुरु आहे. मात्र, हा वाद निरर्थक असल्याचं सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. ‘फैज यांच्या ओळींना हिंदू विरोधी म्हणणं हे इतकं हास्यास्पद आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (CAA) आयआयटी कानपूरमधील काही विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली होती. यावेळी निदर्शकांनी फैज अहमद फैज यांच्या काही ओळी म्हटल्या होत्या. संस्थेतील काही विद्यार्थी व प्राध्यापकांनी फैज यांच्या या शायरीला आक्षेप घेतला होता. ही शायरी हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यातून नवा वाद निर्माण झाला आहे.

यावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली…

जगसुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या ‘हम देखेंगे लाजिम है की हम भी देखेंगे’ ह्या शायरीच्या ओळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बोलावून दाखवली होती. ही शायरी हिंदू विरोधी आहे. असा आक्षेप संस्थेतील काही विद्यार्थी व प्राध्यापकांनी फैज यांच्या या शायरीला आक्षेप घेतला होता. ही शायरी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. यावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर…

जावेद अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना मत मांडलं. ‘फैज हे अखंड भारतातील ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स’ चळवळीतील एक अग्रणी नेते होते. भारत स्वतंत्र झाला, पण फाळणी होऊन. त्यावेळी अनेक लोक मारले गेले. बेघर झाले. दोन्ही बाजूच्या अनेक लोकांनी आपापली घरं सोडून स्थलांतर केले. त्या घटनेनं दु:खी झालेल्या फैज यांनी त्यावेळी ही शायरी लिहिली होती.

पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल हक यांच्याविरोधात त्यांनी ही शायरी लिहिली होती. हक हे जातीयवादी, प्रतिगामी आणि मूलतत्ववादी विचारांचे होते. लिखाणामुळं फैज यांनाही पाकिस्तानबाहेर जावं लागलं. आपल्याकडं जसं हल्ली कट्टरतावादाच्या विरोधात बोललं की देशद्रोही म्हटलं जातं. तसंच, त्यावेळी फैज यांना पाकिस्तान विरोधी ठरवण्यात आलं होतं. अशा व्यक्तीच्या कवितेला हिंदू विरोधी ठरवणं हास्यास्पदच आहे,’ असं अख्तर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments