Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला

जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला

जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती म्हणून त्यांनी संप पुकारले होते . रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा पॉ नोंदवण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं होतं. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होताना दिसले .जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संपाच्या भूमिकेवर जेजे रुग्णालयाचे निवासी डॉक्टर ठाम होते. सरकारने लिखित आश्वासन देऊन मागण्यांसंदर्भात वर्क ऑर्डर काढली, तरच हा संप मागे घेऊ असं संपकरी डॉक्टरांचं म्हणणं होतं.

अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाचं बरंवाईट झालं तर त्याला सरकारच त्याला जबाबदार असेल, असंही संपकरी निवासी डॉक्टरांनी म्हटलं होतं.वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मार्डच्या बैठकीत डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली आणि संप मागे घेण्यास भाग पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments