Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजननाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

Image: The Hindu

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जब्बार पटेल यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली.

पटेल यांच्या नावावर आम्ही मागेच शिक्कामोर्तब केलं होतं. आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचं कांबळी म्हणाले.

जब्बार पटेलांचा असा आहे प्रवास…

संवेदनशील निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या पटेल यांनी मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीला अत्यंत दर्जेदार सिनेमे आणि नाटक दिली आहेत. ‘सामना’, ‘सिंहासन’, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ आदी दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट भाषांतरीत झाला आहे. पटेलांनी थिएटर अकादमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

पटेलांनी अभिनय केलेली नाटके

तुझे आहे तुजपाशी
माणूस नावाचे बेट
वेड्याचे घर उन्हात

दिग्दर्शन केलेले सिनेमे

उंबरठा
एक होता विदूषक
जैत रे जैत
डॉ बाबासाहेब आंबेडकर
पथिक
मुक्ता
मुसाफिर
सामना
सिंहासन

मुख्यमंत्री कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सहकार्य करतील…

१००व्या नाट्यसंमेलनाबाबत काही ठरलं नव्हतं. त्यामुळे हे संमेलन पुढे जाईल की काय? अशी चर्चा होती. आता तो विषयही राहिला नाहगी. राष्ट्रपती राजवट उठली आहे. राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील अशी आशा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments