Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरात होणार, सभेला अमित शहांची हजेरी

महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरात होणार, सभेला अमित शहांची हजेरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापुरात १ सप्टेंबर रोजी होत असून त्या वेळी होणाऱ्या जाहीर सभेला भाजपचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात ठरलेल्या महाजनादेश यात्रेच्या उद्घाटनाच्या सभेला अमित शहा यांनी यावे आणि समारोपाच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे असा  भाजपचा प्रयत्न होता. मात्र,  यात्रा सुरू झाली त्या वेळी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शहा येऊ शकले नव्हते. त्यानंतर पुरामुळे महाजनादेश यात्रा स्थगित करावी लागली होती. ती पुन्हा सुरू झाली असून समारोप सोलापुरात होणार आहे. महाजनादेश यात्रेत २८ ऑगस्ट रोजी जालना येथे सभेला  कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार आहेत

भाजप-शिवसेनेत युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असताना भाजप पक्षसंघटनेला विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज करण्यासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत बूथप्रमुखांचे मेळावे सुरू असून त्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांशीही भाजपचे निरीक्षक चर्चा करत आहेत.

सर्व २८८ मतदारसंघांत निवडणुकीच्या तयारीस लागण्याचा आदेश प्रदेश भाजपच्या बैठकीत घेण्यात आला होता. सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रभारी यांना आपापल्या भागात बूथनिहाय मेळावे घेऊन निवडणूक यंत्रणेतील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आदेश त्या वेळी देण्यात आला होता. त्यानुसार ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत बूथनिहाय मेळावे सुरू झाले आहेत. प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे पाच-दहा विधानसभा मतदारसंघ अशारीतीने या मेळाव्यांना निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाने विधानसभेची जोरदार तयारी केली असून एकहाती सत्ता घेण्याचे मनसुबे आखण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments