Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईऔरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरे म्हणाले...

औरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई : औरंगाबादच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत एकमत नसल्याने भाजपाकडूनही टीका केली जात आहे. शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी करत असताना महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. त्यातच थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटला संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने वाद निर्माण झाला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”.

CMO च्या ट्विटमध्ये औरंगाबादचा संभाजीनगरअसा उल्लेख!Q
CMO च्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण सांसकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या ट्वटिमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमित देशमुख यांचा फोटो देखील वापरण्यात आला होता.

बाळासाहेब थोरातांनी दिला होता हा इशारा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत नाराजी जाहीर केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,” असंही त्यांनी सांगितलं होतं.

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी जाहीर केली. ते म्हणाले की, “माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments