Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : शिवसेनेच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूल्याने भाजपची कोंडी

Maharashtra Vidhan Sabha : शिवसेनेच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूल्याने भाजपची कोंडी

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackerayमुंबई : शिवसेनेनं निकालाचं कल बघता भाजपाचं संख्याबळ घसरताच सरकारमध्ये फिफ्टी-फिफ्टीचा नारा देत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावरही दावा केला आहे. यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळे भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे.
आताच्या मतमोजणीपर्यंत भाजपा 100 जागांवर आघाडीवर तर शिवसेना 60 जागांवर आघाडीवर आहे. सुरूवातीचे कौल आल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागतील असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता.
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला समाधानकारक जागा मिळणार आहे. शिवसेना-भाजपाची युती करून लढलो आहोत. दोघे मिळून सरकार स्थापन करणार असून, सरकारमध्ये फिफ्टी-फिफ्टीच्या सूत्रांनुसार सर्व काही होईल,” असं सांगितलं. अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदापासून सर्व काही वाटून घेणार असल्याचे संकेत दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments