होम महाराष्ट्र मुंबई माणसं आपले करणारे कौशल्य असलेला आपला माणूस संभाजीराव – पञकार विजयकुमार स्वामी

माणसं आपले करणारे कौशल्य असलेला आपला माणूस संभाजीराव – पञकार विजयकुमार स्वामी

लोकसभेची धामधूम सुरू आहे. प्रचाराला वेळ कमी अन उन्हाची काहिली जास्त आहे. त्यामुळं सगळे कार्यक्रम सकाळी लवकर व सायंकाळी होताहेत. आज अशाच एका प्रचार कार्यक्रमास जाताना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर जुन्या रेणापूर नाक्याहून एमआयडीसीकडे निघाले. तेव्हा आमचा छायाचित्रकार मित्र तम्मा पावले यांचं घर रस्त्यात लागले. पालकमंत्री निलंगेकर यांनी खास आपला लवाजमा थांबवून तम्माच्या घरी जाऊन फक्कड चहाचा आनंद घेतला. आमच्या तम्माची अव्वा आणि अण्णा तसेच सौ. वर्षा यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. पंधरा मिनिटं बसून पालकमंत्र्यांनी छान गप्पा मारल्या. माणसं जवळ करण्याची व प्रेमात पाडण्याचे हे कौशल्य संभाजीरावांच्या रक्तातच आहे. त्यांचे वडील माजी आमदार दिवंगत दिलीपभाऊ पाटील यांचा हा गुण संभाजीरावांत उतरलाय. दिलीपभाऊ वेळ, काळ, जागेची पर्वा न करता गप्पांची मैफिल रंगवत. दिलीपभाऊंची धडाडी, धाडसी स्वभाव, माणसं प्रेमात पडण्याची ती शैली संभाजीरावांत तंतोतंत उतरली आहे. भाऊ गेल्याच्या घटनेला विसेक वर्ष लोटली. संभाजीरावांच्या रूपाने पुन्हा दिलीपभाऊ आपल्यात असल्याचा वेगळा आनंद वाटतो. दिलीपभाऊ व माझ्यात आपुलकी व प्रेमाचं नातं जुळवून देणारा आमचा दुवा होता पानचिंचोलीचा आमचा ज्येष्ठ पत्रकार मित्र सत्यप्रकाश होळीकर. आणि छायाचित्रकार मित्र तम्मामुळे संभाजीरावांशी स्नेह कायम आहे…!

#WelDone_Sambhajirao_ji

पञकार
विजयकुमार स्वामी