Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडामराठवाड्याला मिळाले पाच कॅबिनेट, एक राज्यमंत्रिपद

मराठवाड्याला मिळाले पाच कॅबिनेट, एक राज्यमंत्रिपद

maharashtra assembly election 2019मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. यामध्ये मंत्रिमंडळात मराठवाड्याला सहा मंत्रिपद मिळाले आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यात काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना संधी दिली. तर शिवसेनेने पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून तीन महिण्यांपूर्वी शिवसैनिक बनलेले अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे.

Will break the heads, legs of those who will try to split Shiv Sena Abdul Sattar

ashok chavan on bjp

महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबरला सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर आज सरकारचं विस्तार झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मराठवाड्यातील सहा जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.

Dhananjay Munde

काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे कॅबिनेटमध्ये जागा दिली आहे. दुसरीकडे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना संधी दिली आहे.

Rajesh Tope,Rajesh, Tope,Marathwada,Maharashtra, Cabinet,Expansion

Sandipanrao Bhumre,Sandipanrao, Bhumre,Maharashtra, Cabinet, Expansionशिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तर अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मराठवाड्यात शिवसेनेमध्ये इतर नेत्यांच्याही नावाची चर्चा सुरु होती मात्र आच्या विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments