Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मिळाले 'हे' बंगले

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मिळाले ‘हे’ बंगले

shivsena to lodge its MLAs in hotel Rangshardaमुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील आतापर्यंत चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. यातील शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ हा बंगला वाटप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नव्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना रामटेक हा बंगला देण्यात आला आहे. यापूर्वीही भुजबळ हे मंत्री असताना त्यांना हाच बंगला देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ हा बंगला वाटप करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या एका आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना अद्याप बंगला वाटप करण्यात आलेला नाही. याता शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, तर काँग्रेस तर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना अद्याप बंगला वाटप करण्यात आला नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला मुक्काम आता वर्षा बंगल्यावर हलवणार आहेत. त्यामुळे मातोश्री – 2 मधून ठाकरे कारभार चालवणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं आहे.

या मंत्र्यांना मिळाले हे बंगले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  – वर्षा बंगला
नामदार जयंत पाटील   – सेवासदन बंगला
नामदार छगन भुजबळ – रामटेक बंगला
नामदार एकनाथ शिंदे  – रॉयलस्टोन बंगला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments