Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईडीआयजी मोरेंवर आरोप करणारी बेपत्ता तरुणी डेहराडूनला सापडली

डीआयजी मोरेंवर आरोप करणारी बेपत्ता तरुणी डेहराडूनला सापडली

dig nishikant more

मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी बेपत्ता झाली होती. अखेर अल्पवयीन मुलगी डेहराडूनला सापडली. तक्रारकर्त्या मुलीचा शोध सुरु होता.

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले. मोरे यांचा जामीन अर्ज ( ९ जानेवारी ) रोजी पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला होता. मोरे सध्या फरार असून तक्रारकर्ती तरुणीही ९ जानेवारीपासून बेपत्ता होती.

पुणे येथे एस.टी.विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाची  तक्रार होती. तळोजातील एक विकासक व पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. मोरे यांनी विकासकाकडून गाळे विकत घेतले होते. पण त्यांचे उर्वरीत रक्कम न दिल्याने विकासकाने पोलिसांकडे तक्रार केली होती. जूनमध्ये त्यांच्या १७ वर्षाच्या मुलींच्या वाढदिवशी पोलीस उपमहानिरीक्षक मोरे घरी आले आणि मुलीच्या गालावर व शरिरावर केक लावून अश्लील वर्तन केले, अशी तक्रार करताच गुन्हा दाखल केला होता.

सहा महिने तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ….

पोलिसांनी पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात अल्पवयीन मुलगी जूनमध्ये तक्रार देण्यास गेली होती. परंतु सहा महिने पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. अखेर सहा महिण्यानंतर २६ डिसेंबररोजी तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 बेपत्ता तरूणीने चिठ्ठीमध्ये काय लिहीलं होतं.….

मला शोधण्याचा प्रयत्न करु नये. माझ्या आत्यहत्येस डीआयजी जबाबदार असतील, अशी चिठ्ठी या पीडित तरूणीने लिहून ठेवली आहे. अखेर बेपत्ता तरुणी डेहराडूनला सापडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments