Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

MLA Trupti Sawant expelled from Shiv Sena
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना पक्ष प्रमुखाच्या विनंतीनंतरही सावंतांनी माघार न घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तृप्ती सावंत यांची हकालपट्टी केल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या सावंत विद्यमान आमदार होत्या. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तिकीट डावलल्यामुळे आमदारपदी असलेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी मागे घेण्याची विनंती खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतरही तृप्ती सावंत यांचं बंड शमलं नव्हतं.

शिवसेनेने याआधी दहा बंडखोरांना पक्षातून हाकलले आहे. त्यावेळी तृप्ती सावंत आणि राजुल पटेल यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे बंडखोरांबाबत सेना दुजाभाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता येथे चांगलीच रंगत येणार आहे.

अशी होणार लढत…

वांद्रे (पूर्व) : विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना), विरुद्ध झिशान सिद्दीकी (काँग्रेस) ,विरुद्ध तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments