Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रआरे मधील वृक्षतोडीला राज ठाकरेंचा कडाडून विरोध

आरे मधील वृक्षतोडीला राज ठाकरेंचा कडाडून विरोध

मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो ३ या प्रकल्पासाठीची कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २७०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या निर्णयाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  विरोध केला आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करुन आरेमधील वृक्षतोड निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी स्वतः आवाज दिलेला एक व्हिडिओच मनसेने ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी जंगलामुळे किंवा एखाद्या पार्कमुळे शहराचं, राज्याचं आरोग्य कसं चांगलं राहू शकतं ते सांगितलं आहे. मॅनहटन येथील एका पार्कचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. त्याच धर्तीवर त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं उदाहरण दिलं आहे. “न्यूयॉर्कमध्ये पार्क उभारावं लागलं. आपल्याला निसर्गाने हा ठेवा दिला आहे मात्र आपणच त्याचा ऱ्हास केला आहे. बिबळ्या घरात शिरला असं आपण म्हणतो पण तसं नाही आपण त्याच्या घरात शिरलो आहे” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आरेमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.

लता मंगेशकर यांनी काय म्हटलं आहे?

“मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २७०० झाडं कापण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वन्यजीव धोक्यात येणार आहेत मी या वृक्षतोडीचा निषेध करते”

अनेक कलाकार आरेमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,श्रद्धा कपूर यांचाही समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments