Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईकरांचा प्रवास पुन्हा गारेगार , बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी AC बस दाखल

मुंबईकरांचा प्रवास पुन्हा गारेगार , बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी AC बस दाखल

मुंबई : बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. त्यामध्ये प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत मिनी AC बस दाखल झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी कुलाब्यातील बेस्ट मुख्यालयात या बसेसचा लोकापर्ण सोहळा पार पडला. मुंबईतील रस्त्यांवर मिनी एसी बस धावताना दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक बसचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता या सहा मिनी एसी बस मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहेत. या बसमध्ये 21 प्रवाशी बसू शकतात. या बस प्रामुख्याने रेल्वे आणि मेट्रो स्टेशन परिसरात धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे.

दरम्यान या बसचा मार्ग नेमका काय असणार याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीला या बस कुलाबा बस डेपोशी जोडलेल्या असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारज्या ठिकाणी ऑफिसची संख्या जास्त आहेतत्या ठिकाणी या बस चालवल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये एकही वाहक (कंडक्टर) असणार नाही.

येत्या काही महिन्यांत बेस्टचा बसताफा 3500 हून हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यातील काही बस टप्प्याटप्प्यांनी बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहेत. बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी नवीन सुविधा देताना बेस्ट एसी बसमिनीमिडी बसचा समावेश केला आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments