Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकंटेनर - ट्रॅव्हल्सची धडक; एक ठार,पाच गंभीर

कंटेनर – ट्रॅव्हल्सची धडक; एक ठार,पाच गंभीर

मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आज रविवार  २२ डिसेंबरला भीषण अपघात झाला. बंद कंटेनरला खासगी ट्रॅव्हल्सने धडक दिली. यामध्ये एकजण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये रमेश संजय कबाडे वय-२४ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल बस क्रमांक एम.एच-०३ सी.पी-९९०३ ही पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. तेव्हा, एक्स्प्रेस-वे लेन नंबर एकवर कंटेनर क्रमांक (एच.आर-५५ ए.डी-३९२८) बंद पडलेला होता. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ओझर्डे गावाच्या हद्दीत घडली.

पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात…

दुसऱ्या घटनेत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात झाला. ही घटना आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही. अपघात झाला त्यावेळी व्हॅनमध्ये ऐकूण चार पोलीस कर्मचारी होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments