Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईकरांवर करवाढीचा बोजा नाही

मुंबईकरांवर करवाढीचा बोजा नाही

महापालिकेचा 33 हजार कोटींचा बजेट सादर

BMCमुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज मंगळवार (४ फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना यामधून दिलासा देण्यात आला आहे.

आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी ३३ हजार ४४१ कोटींचं बजेट सादर केलं. गतवर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये जास्त पैशांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२०२ साठी ३० हजार ६९२ कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. मात्र, यावर्षीच्या बजेटमध्ये २ हजार ७४९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बेस्टसाठी १५०० कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बेस्टसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कर्जाची परतफेड, वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे, आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी यासाठी वापरली जाणार आहे.

रस्ते आणि वाहतूक विभागासाठी १६०० कोटींची तरतूद

रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत २०२०-२१ मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये १६०० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय फुटपाथच्या दुरुस्तीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षणासाठी २९४४.५९ कोटींची तरतूद

शिक्षण क्षेत्रासाठी २९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांसाठी तसेच अवकाश संशोधनाचे शिक्षण, डिजीटल दुर्बीण आणि वेधशाळेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

उद्यान खात्यासाठी २२६.७७ कोटी, अग्निशमन दलासाठी १०४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यान खात्यासाठी २२६.७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलासाठी १०४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनासाठी १८३.०३ कोटींची तरतूद

मुंबई महानगरपालिकेने पर्यटनासाठी एक समर्पित विभाग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातील दैनंदिन उपक्रम तज्ञ आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट्सद्वारे चालविले जातील. पर्यटन आणि हेरिटेजसाठी अर्थसंकल्पात १८३.०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांच्या वसतिगृहासाठी १० कोटींची तरतूद

पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त वसतिगृह बनणार आहे.

इनक्यूबेशन लॅबसाठी १५ कोटींची तरतूद

मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी वर्षात नोकरभरती नाही

उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरभरती आगामी वर्षात होणार नाही, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बजेट सादर करताना केली.

अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये

  • रिअल इस्टेट, आर्थिक मंदीमुळे मालमत्ता कराची एकूण संचित थकबाकी १५००० कोटीपर्यंत वाढली
  • रोज केलेले काम आणि कामाचे तास यावर कर्मचाऱ्यांचे भत्ते ठरवणार.
  • बेस्टचा सध्याचा प्रति किमी खर्च १३० रुपये आहे, भाडेतत्वावरील नवीन बसच्या वापरामुळे हा खर्च प्रति किमी ९५ रुपये होईल.
  • बेस्टला १५०० कोटींचे अनुदान देणार
  • प्रकल्पबाधितांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करणार
  • कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींच्या निधीची तरतूद
  • मार्च २०२०२ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील आणखी १२४० बस येणार. त्यामुळे प्रतिदिन ४५ लाख प्रवाशांना सेवा देणं शक्य होणार आहे.
  • सध्या पाच ठिकाणी डायलेसिसची सुविधा उपलब्ध आहे. चेंबूरच्या मॉ रुग्णालय, व्ही.एन देसाई सांताक्रूझ येथे खासगी सार्वजनिक तत्वावर डायलेसिस सुविधा देण्यात येणार
  • ४० कोटी रकमेच्या तीन एमआरआय, तीन सीटीस्कॅन, मशीनच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु
  • बालरुग्ण व नवजात अर्भकांसाठी ३० नवीन व्हेन्टिलेटर्स
  • आता रुग्णालयात ओपीडीची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतची राहणार
  • पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्गाची कमतरता भरून काढणार
  • पालिकेचा जेंडर बजेट ३२६ कोटींचा. पात्र महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून १३ कोटींची तरतूद. सॅनिटरी पॅड मशीन २२७ कोटींची तरतूद
  • महिलांसाठी शौचालयाचा वापर नि:शुल्क देण्याचा प्रस्ताव
  • सार्वजनिक जागांवर महिलासाठी शौचालये आरक्षित ठेवण्यात येणार
  • एफएसएआयच्या अनधिकृत वापरासाठी रेडी रेकनरच्या १५ टक्के शुल्क आकारणार. बिल्डर याचा लाभ घेतील. पालिकेच्या उत्पन्नात ६०० कोटीची वाढ होणार.
  • पूर्व उपनगरातील तीन रूग्णालयात डी.एन.बी अभ्यासक्रम सुरू करणार
  • पालिका मुंबईतील १८४ पुलांची दुरुस्ती करणार
  • मुंबईत २१ नवीन पूल बांधणार
  • ४७ पुलांची मोठी दुरुस्ती करण्यात येणार
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments