Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण: एनआयएकडे तपास देण्यावरून भाजप आक्रमक

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण: एनआयएकडे तपास देण्यावरून भाजप आक्रमक

mystery-of-mansukh-hiren-death-that-body-was-found-outside-the-antilia-bjp-ats-maha-vikas-aghadi
mystery-of-mansukh-hiren-death-that-body-was-found-outside-the-antilia-bjp-ats-maha-vikas-aghadi

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ स्फोटके ठेवण्याकरीता ज्या मनसुख हिरेन यांची मोटार वापरण्यात आली त्या हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र मृत्यू प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई गुन्हे शाखेकडून  मनसुख हिरेनच्या मृत्यूची चौकशी मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविली. दरम्यान, भाजपने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदार नारायण राणे यांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन आणि तपसाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मृत्यूबाबत योग्य तपास होईल असं वक्तव्य केलं आहे. विरोधकांनी संयम बाळगला पाहिजे. मृत्यूचे राजकारण करु नये असे ठणकावून सांगितले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी चौकशी करण्यासाठी न्यायाधीश नेमले जावेत, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा:वेळीच आवाज उठवला नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; आमदार रोहित पवारांचा इशारा

ठाण्यातील एका पोलिस अधिका-याने माध्यमांना सांगितले की, मनसुख गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका ऑटोरिक्षात दुकानातून बाहेर पडला होता आणि तेव्हापासून त्याचा फोन बंद होता. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरी न गेल्याने त्यांच्या कुटुंबियांनी हरवलेल्या व्यक्तीचा अहवाल दाखल केला आणि नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंब्रा येथे एक मृतदेह सापडला आणि नंतर मृत मनसुख असल्याची खात्री पटली. त्यांचे शवविच्छेदन ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले. न्यायवैदयक विभागाचे प्रमुख डॉ.मंगेश घाडगे यांच्या चमून हे शवविच्छेदन केले.

पोलीस छावणीचे स्वरुप

मनसुख यांच्या विजय पाम या इमारतीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

अखेर मृतदेह घेतला ताब्यात

हिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे,असा आग्रह त्यांच्या कुटुंबियांनी धरला होता. इनकॅमेरा पुन्हा शवविच्छेदन केल्यानंतर तसेच मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल. असा पवित्रा मनसुख कुटुबीयांनी घेतला होता. मात्र,मृतदेहाची हेळसांड होऊ दिली जाणार नाही व तापासात पारदर्शकता ठेवली जाईल असे ठाणे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीडीआरमधून मृत्यूचे गूढ उलगडणार

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही. त्यांचा मोबाईलही गायब आहे. सीडीआर काढले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ते ताब्यात घेतले. हिरेन यांना दोन दिवसांपासून आलेले मोबाइल व अखेरचा फोन कोणाचा आला होता. त्यांनी कोणाशी संभाषण केले होते. याचा उलगडा करण्यात येत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments