Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनालासोपारा : गटाराच्या पाण्यात  वाहून गेल्याने सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नालासोपारा : गटाराच्या पाण्यात  वाहून गेल्याने सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबई: मुंबईसह अनेक भागाला काल पावसाने झोडपले. यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये हाहाकार उडाला होता. नद्या नाले गटारे सर्व काही अगदी तुडुंब भरून वाहत होते. कांदीवलीची येथे चिमुकला नाल्यामध्ये वाहून गेला होता ही घटना ताजी असताना पुन्हा नालासोपारा येथील संतोष भुवन येथे नाल्यामध्ये 6 वर्षीय चिमुकला वाहून गेला.

अबू बकर असे चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या आईवडिलांनी या घटनेनंतर तुळींज पोलीस स्थानकात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. यानंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अबू बकरचे शोधकार्य सुरू केले. 24 तासाच्या शोध कार्यांनंतर आज या चिमुकल्याचा मृतदेह ओस्तवाल नगर येथे सापडला आहे.

याबाबत तुळींज पोलीसांच्या माहितीनुसार, संतोष भुवन शेजारील गटाराचे झाकण उघडे होते, शेजारी रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने हे उघडे गटार चटकन लक्षात आले नाही. यावेळी अबूचा पाय त्या गटारात पडला आणि पाण्याच्या ओढ्यासोबत तो खेचला गेला. साहजिकच 24 तासानंतर मुलाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून बकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी महापालिकेला जबाबदार ठरवत बकर कुटुंबांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

काल मुंबईत पावसाचा प्रचंड जोर होता, त्यामुळे ज्या तुळींज पोलीस स्थानकात बकर कुटुंबीयांनी धाव घेतली ते पोलीस स्थानकही पाण्यात बुडले होते. दरम्यान, अशा प्रकारे गटारात किंवा मॅनहोल मध्ये पडून यापूर्वीही अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments