Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनारायण राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं का ?, अनिल परब

नारायण राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं का ?, अनिल परब

Anil parab, Narayan raneमुंबई : नारायण राणेंनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. पण त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे का ? असा सवाल सेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. यामुळ राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष जोरात रंगणार आहे.

भाजपनं नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू केली असताना शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आता त्यांच्या भात्यातले बाण बाहेर काढलेत. नियमांवर बोट ठेवत त्यांनी नारायण राणेंच्या उमेदवारीवरच सवाल उपस्थित केले. अर्ज भरण्याआधी राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं का ?, जर हो तर कधी स्वीकारलं जर ते भाजपचे सदस्य झाले तर मग महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला का, असे प्रश्न सेनेचे मुंबईतले आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहे.

याचं कारण असं की, एकच व्यक्ती एकाच वेळेला दोन पक्षांच्या सदस्य असू शकत नाही. आता यावर भाजप किंवा खुद्द राणेंकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल परब यांनी उपस्थित केले हे सवाल

.नारायण राणे नेमके कुणाचे.?

.नारायण राणे यांनी कोणाच्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला?

.राणेंना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले?

.त्याची काही पावती, इमेल, नेमका कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपचे सदस्यत्वं स्वीकारले ?

.जर नारायण राणे यांनी सदस्यत्वं स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या स्वाभीमानी पक्षाचा राजीनामा दिला का..?

.त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने सदस्यत्वं कधी दिले…?

जर दिले नसेल तर राज्यसभा कशी दिली ?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments