Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विचार करेल : छगन भुजबळ

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विचार करेल : छगन भुजबळ

Senior NCP leader Chhagan Bhujbal admitted to hospitalमुंबई : पंधरा दिवस उलटूनही शिवसेना भाजपमधील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादीकडून सकारात्मक विचार केला जाईल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे की उपमुख्यमंत्रिपद याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा. तसंच शिवसेनेने हिंमत करून सत्तास्थापनेचा दावा करावा,” असं भुजबळ म्हणाले. जनतेनं आम्हाला विरोधीपक्षात बसण्याचा कौल दिला आहे, हे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद यापैकी काय हवं ते त्यांनी आधी ठरवलं पाहिजे. जर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने प्रस्ताव पाठवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तासंघर्षावरून शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे राज्याला स्थिर सरकार सध्यातरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments