Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत : उध्दव ठाकरे

नाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत : उध्दव ठाकरे

मुंबई : मुंबईतल्या कष्टकरी वर्गाला रात्रीच्यावेळी जेवणासह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणं म्हणजे नाइट लाइफ. मौजमजा, छंद फंद नाहीत. पब आणि बार असा नाइट लाइफचा अर्थ होत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.

मुंबईकर हा दिवसासुध्दा कष्ट करतो तो थकूनभागून उशिरा संध्याकाळपर्यंत घरी जातो. घरी जाऊन थोडासा विसावून उशिरा संध्याकाळी घरी जातो. घरी जाऊन थोडा विसावून बाहेर पडतो. कुटुंबासमवेत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे हे सुद्ध नाइट लाइफमध्ये आहे. या सगळ्या गोष्टी नाइट लाइफ आहेत. म्हणजे मुंबई ट्वेंटी फोर बाय सेव्हन  असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाइट लाइफमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस रात्री झोपतात हा विरोधी पक्षाचा गैरसमज आहे. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी आपला पोलीस खरोखर त्याला मुजराच केला पाहिजे. तो चोवीस तास जागा असतो असे मुख्यमंत्री म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या नाइट लाइफच्या भूमिकेला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तिसरी पाळी असते, रेल्वे जर का रात्रीपर्यंत चालू असतात, त्या प्रवाशांची सोय कोणी पाहायची? असे नाइट लाइफचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments