Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: मधील माजी आमदारांपाठोपाठ विद्यमान आमदारही भाजप-शिवसेनेकडून चाचपणी करीत आहेत. इगतपुरी-त्र्यंबकच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश. आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना की काँग्रेस यापैकी कोणाकडून लढविणार याबाबत त्या संभ्रमात असल्याची चर्चा होती. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठोपाठ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची गावित यांनी भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात होते.

इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघात गावित या सलग दोनवेळा निवडून आलेल्या आहेत. यंदा त्या हॅट्‌ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. आदिवासी बहुल मतदारसंघाचा कल हा काँग्रेसकडेच राहिला आहे. परंतु, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वच गड उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे काँग्रेसशी निष्ठावान असलेले गावित कुटुंबीय सुद्धा संभ्रमात होते. आमदार गावित यांचे बंधू भरत गावित यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपची सलगी साधली. नंदुरबारमधील नवापूर मतदारसंघात सुरुपसिंह नाईक यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याने पक्षनिष्ठा बाजूला ठेवत गावित कुटुंबाने कमळ हातात घेतला.

गेल्या महिन्यात आमदार गावितांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर गावित यांनी मुंबईत शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली.व आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments