Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई'या' अभिनेत्रीलाही कोरोना!

‘या’ अभिनेत्रीलाही कोरोना!

Olga Kurylenko sufffers from coronavirusमुंबई : राजकारण्यानंतर कोरोनाने हॉलीवूडवरही झडप घातली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ओल्गा कुरिलेन्कोने खुलासा केला आहे की ती कोरोनाव्हायरस पॉसिटीव्ह आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे.

2008 च्या जेम्स बाँड चित्रपटाच्या क्वांटम ऑफ सोलेस (2008’s James Bond film Quantum of Solace) आणि 2013 ची साय-फाय फिल्म ओब्लिव्हियनमध्ये मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ती घरीच बंद आहे. यासंदर्भात ओल्गाने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

 


काय म्हणाली ओल्गा कुरिलेन्कोने…

ओल्गाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबाबत तिने कोरोना व्हायरसबाबत केलेली चाचणी पॉसिटीव्ह आल्याचं लिहिलं आहे. तिने तिच्या घराच्या खिडकीतील एक फोटो शेअर केला आहे. ‘कोरोनाचं निदान झाल्यामुळे घरीच बंद’ अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

ती पुढे असं म्हणाली आहे की, ‘ मी आता जवळपास एका आठवड्यापासून आजारी आहे. ताप आणि थकवा ही माझी मुख्य लक्षणे आहेत. स्वतःची काळजी घ्या आणि हे गांभीर्याने घ्या!’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments