Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रबदलापूर रासायनिक प्लांटच्या ड्रायरचा स्फोट; एकाचा मृत्यू , तीन जखमी

बदलापूर रासायनिक प्लांटच्या ड्रायरचा स्फोट; एकाचा मृत्यू , तीन जखमी

One killed, three injured in explosion at Badlapur chemical company
Image: TOI

बदलापूर : बदलापूर एमआयडीसीमध्ये बुधवारी सकाळी एका रासायनिक प्लांटच्या ड्रायरचा स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर आग पूर्ण प्लांट मध्ये पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली व त्यांनी आग आटोक्यात आणली.

बदलापूर एमआयडीसी परिसरातील के जे रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्फोट झाला. त्या ठिकाणी काम करणाऱ्या विष्णू धडाम या ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. याच ठिकाणी काम करणाऱ्या विजय पिंग्वा हा 20 वर्षीय तरुण 90 टक्के भाजला आहे. झागरा मोहतो हे 56 वर्षे कामगार 80 टक्के भाजले आहेत, तर त्यांच्यासोबतच काम करणारा विनायक जाधव या 55 वर्षीय कामगाराला देखील 40 टक्के भरले आहे. या तिघांची प्रकृती चिंताजनक असून जखमी कर्मचार्‍यांना बदलापूरच्या धन्वंतरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे त्यांना ऐरोलीच्या बर्न सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.

के जे रेमेडीज कंपनीमध्ये रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया करून त्याची ड्रायरमध्ये पावडर तयार करण्याचे काम सुरू होते. या ड्रायरमध्ये प्रचंड दाब वाढल्याने त्या ड्रायरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments