Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतरुणीला 'आयटम' म्हणाला आणि तुरुंगात गेला!

तरुणीला ‘आयटम’ म्हणाला आणि तुरुंगात गेला!

CSIA Airport,shivaji airport,chhatrapati airport,chhatrapati shivaji airport,mumbai airport,mumbai,csiaमुंबई विमानतळावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ‘आयटम’ म्हणून हाक मारणे रोडरोमीयोला चांगलेच महागात पडले. मुंबई विमानतळावर काम करणारी महिला कर्मचारी राजेंद्र प्रसाद नगर भागातील बस स्टॉपवर थांबलेली असतांना हा प्रकार घडला.
दिनेश यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार, मुंबई विमानतळावर काम करणारी महिला कर्मचारी काम आटोपून घराच्या दिशेने निघाली होती. राजेंद्र प्रसाद नगर भागातील बस स्टॉपवर महिलेला तिच्या सहकाऱ्या सोबत आली. त्यावेळी आरोपी यादव याने त्या महिला कर्मचा-याकडे बघून ‘आयटम’ अशी हाक दिली.
हा प्रकार घडल्यानंतर संतप्त महिलेने व तेथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. व पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. घटना घडली त्यावेळी आरोपीने दारूचे सेवन केले असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 354 अ (लैंगिक छळ), 509 (महिलेचा विनयभंग करण्याचा उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments