Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटींचा हृदयविकाराने मृत्यू !

पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटींचा हृदयविकाराने मृत्यू !

PMC Bank Account holder Sanjay Gulati dies of heart attack
मुंबई : पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामुळे ग्राहाकांना चांगलाच फटका बसला आहे. लादण्यात आलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसमोर निदर्शने करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. यामुळे इतर खातेदारांमध्ये भिती पसरली आहे.

संजय गुलाटी (वय ५१) असं या खातेदाराचं नाव आहे. संजय यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत त्यांचं खातं होतं. बँकेवरील निर्बंधांमुळं त्यांचे ९० लाख रुपये अडकले होते. सोमवारी दुपारी खातेदारांनी तारापोर गार्डन परिसरातील बँकेच्या शाखेसमोर निदर्शनं करण्याचं ठरवलं होतं. आपल्या पैशाचंही काहीतरी होईल, या आशेनं गुलाटी देखील त्यात सहभागी झाले होते.

काही वेळ निदर्शनं केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले. संजय गुलाटी सुद्धा साडेतीनच्या सुमारास घरी आले आणि झोपले. पावणे पाचच्या सुमारास त्यांनी पत्नीकडं काहीतरी खायला देण्यास सांगितलं. ते खात असतानाच ते कोसळले. घाबरलेल्या त्यांच्या पत्नीनं सोसायटीचे सचिव यतींद्र पाल यांना फोन केला. त्यांनी तातडीनं धाव घेऊन संजय यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृच घोषित केले.

संजय गुलाटी जेट एअरवेजचे माजी कर्मचारी

संजय आणि त्यांचे वडील दोघेही जेट एअरवेजचे माजी कर्मचारी होते. संजय यांची जेटमधील नोकरी गेली होती. पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळं त्यांची बचतही अडकली. त्यांना कुठलाही मोठा आजार नव्हता. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी माध्यमांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments