Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतीन बळी : PMC बँकेत १ कोटी अडकल्याने महिला डॉक्टरची आत्महत्या

तीन बळी : PMC बँकेत १ कोटी अडकल्याने महिला डॉक्टरची आत्महत्या

PMC bank account holder dr kill self
मुंबई : पीएमसी बँकेत घोटाळा झाल्याने लाखो रूपये अडकले होते. त्या तणावामुळे तीन ग्राहाकांचा बळी गेला आहे. पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉक्टर योगिता बिजलानी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ग्राहाकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. दोन खातेदारांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. आता बिजलानी यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. बिजलानी यांना १८ महिन्यांच्या बाळ आहे.गेल्या काही दिवसांपासून योगिता बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या.

डॉ. बिजलानी यांच्या पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल १ कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. डॉ. बिजलानी या आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. आपल्या १८ महिन्यांच्या बाळासह त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या दोन ग्राहाकांचा गेला बळी…

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाल्यामुळे आयुष्याची मिळकत विनाकारण अडकल्याने हजारो खातेदार चिंताग्रस्त आहेत. घोटाळा झाला तेंव्हापासून ग्राहाक तणावाशी सामना करत आहेत. दोन खातेदारांचा चोवीस तासांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

यामध्ये संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांनी आत्महत्या केली. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. पीएमसी बँकेवर आलेल्या र्निबधांनंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने ते दोघेही मानसिक तणावात होते. आता इतर ग्राहाकांचीही चिंता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments