Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकांदिवलीतील बनावट नोटाच्या अड्यावर छापा

कांदिवलीतील बनावट नोटाच्या अड्यावर छापा

Fake currency kandivali charkop
Image : The Hindu

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील कांदिवली चारकोप मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तर एका आरोपीली अटक करण्यात आली.

एैन निवडणुकीच्या तोंडावर अन् दिवाळीचा सण असताना हा प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. एकीकडे मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरु असताना पैसे पकडले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येही गोंधळ उडाला आहे. आरोपीच्या घरात एकून अडीच लाखांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. जमा केलेल्या नोटांमध्ये 500 आणि 2 हजारच्या नोटा आहेत. यांसह घरात कटर, झेरॉक्स प्रिंटर आणि कार्टेज अशा वस्तू सापडल्या आहेत. क्राईम ब्रँचच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. आरोपी गेल्या चार महिन्यांपासून बनावट नोटा मार्केटमध्ये चालवत आहे. त्यामुळे आता पर्यंत लाखोंच्या नोटा मार्केटमध्ये चालवल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दिवाळीचा सण जवळ आला आहे. बाजारात मोठ्या ग्राहक वस्तू किंवा इतर सामान खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या सर्व घटना बघता पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र, याचा मास्टर माईंड कोण, अद्यापर्यंत किती बनावट नोटा छापल्या हे अद्यापही समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments