Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : प्रदीप शर्मांचा नालासोपा-यात राजकीय एन्काउंटर

Maharashtra Vidhan Sabha : प्रदीप शर्मांचा नालासोपा-यात राजकीय एन्काउंटर

Pradeep Sharmaमुंबई : पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदीप शर्मांनी प्रसिध्दी मिळवली होती. परंतु राजकीय मैदानात ते टिकू शकले नाही. नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या प्रदीप शर्मांचा बविआचे क्षितिज ठाकूर यांनी राजकीय एन्काऊंटर केला.
प्रदीप शर्मांच्या उमेदवारीवरून नालासोपा-यात चांगलीच रंगत आली होती. येथे ठाकूर कुटुबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही लढाई तितकी सोपी नव्हती. या मतदारसंघात आतापर्यंत २००९ आणि २०१४ अशा दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत वसईतील पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो. अखेर ठाकूर कुटुंबियांनी येथे आपले वर्चस्व कायम राखले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments