Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपंतप्रधान मोदींची साता-यातील ‘दोन राजेंसाठी’ पहिली सभा

पंतप्रधान मोदींची साता-यातील ‘दोन राजेंसाठी’ पहिली सभा

Narendra Modi, prime ministerमुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले खासदार उदनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मैदानात उतरलेले आहेत. या उमेदवारांना दगाफटका बसू नये. पराभवाच्या भितीमुळे पंतप्रधान मोदींची साता-यात सभा होत आहे. १३ ऑक्टोबरला सैनिक स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बाल्लेकिल्यात होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर १७ ऑक्टोबरला पुण्यात सभा होणार आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेची निवडणूक अशा दोनही निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणूका भारतीय जनता पक्षाने अधिकच गांभीर्याने घेतल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तब्बल ९ सभा घेण्याचे ठरवले आहे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकूण १८ सभा घेणार आहेत. यामुळे प्रचारात चांगलीच रंगत येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments