Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईईडीची चौकशी ‘या’ कारणामुळे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट!

ईडीची चौकशी ‘या’ कारणामुळे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट!

मुंबई: उद्योगपती, देणगीदारांनी आर्थिक मदत करू नये म्हणून माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली. असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे सोमवारी मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलत होते. एमआयजी क्लब वांद्रे येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही, असही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं कारणही सांगितलं.ईव्हीएम विरोधाची भूमिका मी घेतली होती. निवडणूक लढवावी की नाही या विचारात मी होतो. मी अनेक नेत्यांना भेटलो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट घेतली. परंतु कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यानंतर आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा ? असा विचार केला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत.

दोन दिवसात मनसेची उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसंच 5 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल. माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश नक्की मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजपकडून कुठली ना कुठली चूक होईलच आणि त्यात आपल्याला यश मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments