Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज ठाकरे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना

राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज ठाकरे सोबत त्याचा पत्नी शर्मिला ठाकरे ,मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे त्याचसोबत
मनसेचे नेते बाला नांदगावकर व इतर नेते हि राज सोबत ED कार्यालयात रवाना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments