Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबाजारात ३५० रुपयाचं नाणं!

बाजारात ३५० रुपयाचं नाणं!

RBI, Mumbai, 350 Coin

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच ३५० रुपयांचं नाणं जारी करणार आहे. गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या ३५० व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी आरबीआय ही नाणी बाजारात आणणार आहे. याची उत्सुक्ता सर्वांनाच लागली आहे.
ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत.आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.
काय आहे ३५० रुपयांच्या नाण्याचं वैशिष्ट्य
चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित ३५० रुपयांचं हे नाणं ४४ एमएमचं असेल. नाण्याच्या पुढच्या भागात अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेलं असेल. याच भागात रुपयाचं चिन्ह आणि मध्ये ३५० मुद्रीत असेल. तसंच नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा ३५० वा प्रकाश उत्सव लिहिलेलं असेल. यावर १६६६-२०१६ हे देखील मुद्रीत केलेलं असेल.
इतका असणार नाण्याचं वजन
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, नाण्याचं वजन ३४.६५ पासून ३५.३५ ग्रामच्या दरम्यान असेल. बाजारात किती नाणी जारी केली जाणार ह्याची माहिती अद्याप दिलेली नाही.
नाण्यात कोणत्या धातूचं किती प्रमाण?
आरबीआयकडून जारी होणाऱ्या ३५० रुपयांच्या नाण्यात चांदीचं प्रमाण ५० टक्के, तांबे ४० टक्के, निकेल पाच टक्के आणि झिंक पाच टक्के असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments