Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश!

सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश!

Chief Minister Uddhav Thackeray today at Fort Shivneri

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोमवारी राज्यातील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफिचा निर्णय घेतला तो सर्वांपर्यंत पोहचविणे, तसेच सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविणे यासाठी सूचना केल्या. शिवसेना भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास एकतास ही बैठक चालली. बैठकीनंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने राज्यात चांगले निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. हा संदेश सर्व शेतक-यांपर्यंत पोहचविणे दिलेला शब्द पाळला हे मतदारांना जाऊन सांगणे याबाबत पदाधिका-यांना सूचना देण्यात आल्या.

तसेच पुढच्या महिण्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवरी रोजी जयंती असून त्यानिमित्ताने राज्यात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी पदाधिका-यांसोबत चर्चा केली.

शिवसेना मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेना सदस्य नोंदणी यासह विविध विषयांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत बैठकीत चर्चा झाली.

सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याच्या सूचना केल्या – खासदार राहुल शेवाळे.
सरकारने शेतकरी कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे. त्याबाबत सर्वांपर्यंत ही माहिती पोहचविणे. सरकारच्या विविध योजना तळागाळाच्या नागरिकांपर्यंत पोहचविणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. सरकार भविष्यात लोकहिताचे निर्णय घेणार आहे. त्यासाठी आमचं सरकार कटिबध्द राहणार आहेत. असेही शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments