Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसंतापजनक : आरपीएफ जवानाचा टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार

संतापजनक : आरपीएफ जवानाचा टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार

RPF Constable rape taxi driverमुंबई : आरपीएफ कॉन्स्टेबलने चक्क टॅक्सीचालकावर जबरदस्ती करत, अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापनजक प्रकार समोर आला आहे. वेश्या वस्तीत टॅक्सी नेण्यास विरोध केल्याने, कॉन्स्टेबलने थेट टॅक्सीचालकावरच अनैसर्गिक कृत्य केलं. याप्रकरणी आरोपी कॉन्टेबलविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

आरोपी कॉन्स्टेबल हा शनिवारी रात्री पीडित चालकाच्या टॅक्सीत बसला होता. त्यावेळी कॉन्स्टेबलने टॅक्सी ग्रॅण्ट रोड इथल्या वेश्या वस्तीत नेण्यास बजावलं. मात्र टॅक्सी तिकडे नेण्यास चालकाने नकार दिला. त्यावेळी कॉन्स्टेबलने थेट चालकाला मारहाण करुन त्याच्यासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. आरोपी कॉन्स्टेबल ११ जानेवारीला दुपारी ४ ते रात्री ११ अशी ड्युटी करुन आला होता. त्यावेळी त्याने टॅक्सीचालकाला टॅक्सी डिमेलो रोडकडे नेण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने टॅक्सी ग्रॅण्टरोडवरील वेश्या वस्तीत नेण्यास बजावलं. मात्र टॅक्सीचालकाने त्याला नकार दिल्याने, कॉन्स्टेबलने त्याला मारहाण केली.

आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीत नेऊन, अनैसर्गिक कृत्य करत बलात्कार केला. याशिवाय कॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि चावीही काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर एमआरए मार्ग  पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. त्याच्याविरोधात कलम ३७७ अनैसर्गिक कृत्य, कलम ३९४ लूट यासह कलम ३८७,३४१,३२४,५०४ आणि ५०६ (२ ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments