Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईटिकटॉक अ‍ॅपवर बंदीसाठी मुंबई उच्चन्यायालयात धाव

टिकटॉक अ‍ॅपवर बंदीसाठी मुंबई उच्चन्यायालयात धाव

Runs at Mumbai High Court to ban tiktok app
मुंबई : टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घाला, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. टिकटॉक अ‍ॅपमुळं मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हीना दरवेश नामक मुंबईतील गृहिणीनं ही याचिका केली आहे.

टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन असल्याचंही दरवेश यांनी याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेते, याकडं आता लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड होणारं अ‍ॅप ठरलं…

टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. ‘बाइट डान्स’ नामक कंपनीनं २०१६ साली हे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड होणारं अ‍ॅप ठरलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments