Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअजित पवारांना 'या' राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांनी घातली साद

अजित पवारांना ‘या’ राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांनी घातली साद

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे राज्यात भूकंप झाला. एकीकडे अजित पवारांना समजून घालण्याचा प्रकार सुरु आहे. तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई महाआघाडी लढत आहे. तया सर्व घडामोडी घडत असतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भावनिक साद घेतली आहे.

अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टवर चाकणकर यांनी कॉमेंट करत अजित पवार यांना भावनिक आवाहन करत परत येण्याची विनंती केली.

आपली माणसं बरोबर असावी……इतकंच मागणं…

“दादा महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यावतीने तुमच्यापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून पोहचण्याचा प्रयत्न करतेय. इतरवेळी आमच्यासाठी सहजासहजी संपर्क होणारे “दादा”,परवापासून अचानक तटस्थ झाले….., दादा, एकच विनंती आहे, आयुष्यभर वडिलांची सावली ज्यांनी दिली, आभाळमाया दिली, कोजागिरी पौर्णिमेला ज्यांच्याबद्दल बोलताना तुमचा कंठ दाटून आला त्यांच्याकडे बघून एकदा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करा. शेवटी आयुष्याची संध्याकाळ होत असताना, आपली माणसं बरोबर असावी……इतकंच मागणं”, असं रुपाली चाकणकर यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments