Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेच्या संदीप देशपांडेंना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मनसेच्या संदीप देशपांडेंना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Sandeep Deshpande, MNSमुंबई : दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावलेले होते. या प्रकरणावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे मनपा अधिका-यांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी देशपांडे यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी देशपांडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली होती. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना आज अटक करण्यात आली.

दादर-माहिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली होती महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन माजी नगरसेवक देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यात वाद झाला होता. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

कंदिल हटवल्यावरून वाद…

दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावलेले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही होता. मनसे दरवर्षी हे कंदिल लावतात आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली. ते सर्व कंदिल काढले. यावेळी मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचंही ते म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही, असा मनसे स्टाईल इशाराही त्यांनी दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments