Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसंजय निरुपमांचा काँग्रेसचा प्रचार करण्यास नकार; वाद चव्हाट्यावर!

संजय निरुपमांचा काँग्रेसचा प्रचार करण्यास नकार; वाद चव्हाट्यावर!

Sanjay Nirupamमुंबई : मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष, माजी खासदार संजय निरुपम यांनी पक्षाबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी पक्षाच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सहभाही होणार नाही, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.

मी शिफारस केलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभेत उमेदवारी दिली नाही. अशी नाराजी निरुपम यांनी व्यक्त केली. मी पक्षश्रेष्ठींकडे बोललो असून हा माझा अंतिम निर्णय असल्यांचेही निरुपम यांनी नमूद केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला. यावरून काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments