Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवार आज ईडीच्या दारी; ईडीसमोर पेच कायम!

शरद पवार आज ईडीच्या दारी; ईडीसमोर पेच कायम!

मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय(ईडी) ने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आज शुक्रवारी स्वत: मुंबईतील कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्या भूमिकेमुळे आता ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता वर्तवली आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मुंबईसर राज्यात राष्ट्रवादीक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका : पवार

“पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये,” असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे केले. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवारांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दडपशाही करु नये – धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबध नसताना निवडणुकीच्या वेऴी नोटीस बजावली. भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला आहे. राज्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी,सरकारने दडपशाही करु नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments