Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना-भाजपात काय ठरलंय ते सर्वांसमोर यावं : एकनाथ खडसे

शिवसेना-भाजपात काय ठरलंय ते सर्वांसमोर यावं : एकनाथ खडसे

eknath-khadse,Assembly Elections 2019मुंबई : सत्ता स्थापनेबाबत भाजपा-शिवसेनेत काय ठरलंय हे सर्वांसमोर यावं, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते मा एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

खडसे म्हणाले, महायुतीचे राज्य यावं ही सर्वांची इच्छा आहे. युतीमधील वाद लवकरचं मिटेल आणि सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी नाही तर शिवसेनेच म्हणणं आहे जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. त्यामुळे ज्यांच्यासमोर जे काही ठरलं आहे ते सर्वांसमोर यावं.” तरीही शिवसेना-भाजपात मध्यस्थी करण्याऐवढा आता मी मोठा राहिलो नाही, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली.

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केले त्यावर अमित शाह यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आमच्यासमोरही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचेचं नाव आहे. सत्तास्थापनेबाबत भाजपा बँकफुटवर नाही तर भाजपाचा तो स्वभाव आहे. युती टिकवण्यासठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. दोघा भावांमध्ये समन्वय व्हावा युती तुटी नये यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असेही यावेळी खडसे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments