Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना आमदारांचा मुंबईत पुन्हा मुक्काम

शिवसेना आमदारांचा मुंबईत पुन्हा मुक्काम

Shiv Sena MLA from the state in mumbai
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सूटणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना आमदारांची शुक्रवारी बैठक होणार आहे. यावेळी आमदारांना मुक्कामाच्या तयारीने येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची शुक्रवारी 22 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे आजच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल. त्यामुळे शिवसेनेने सर्व आमदारांना मुंबईमध्ये तयारीने बोलावले आहेत.

सर्व आमदारांना पुन्हा एकदा अज्ञात ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच या सर्व आमदारांना आठवडाभराच्या तयारीने बोलावलं आहे. कपडे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत आणण्यास सांगितले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर आमदारांची ओळख परेड होत असताना काहीही अडचण येऊन नये म्हणून असं केलं जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments