Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना टोला 

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना टोला 

मुंबई: अभिनेता संजय दत्त महादेव जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून महादेव जानकरांना लगावला.

जानकर म्हणाले होते की, त्यांचा पक्ष कमळ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली 5 वर्षे त्यांच्या पक्षाचा भुंगा हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे. मात्र तरीही जानकर बोलले आता हा देखील सौम्य विनोद आहे असे कोणी समजू नये असाही टोला शिवसेनेने महादेव जानकारांना लगावला आहे. सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी रासपाच्या मेळाव्यावर आणि संजय दत्त यांच्या कथित रासपावर आपला राग व्यक्त केला आहे. राजकारणातील निखळ विनोद संपत चालला आहे कारण राजकारणात त्या तोलामोलाची व्यक्तिमत्वे उरलेली नाहीत. तरीही अधूनमधून विनोद घडत असतात.

राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले की, अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात रासपात प्रवेश करणार आहेत. इतकेच नव्हे तर जानकरांच्या पक्षाचा संजय दत्त जोरदार प्रचारही करणार आहे. मेळावा झाला की नाही याबाबत कुठे फारशा बातम्या आल्या नाहीत पण मेळाव्यातील संजय दत्त प्रवेश करणार या जानकरी दाव्याने मात्र करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटले असे वाटेल होते पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना जाहीर केल्या मात्र त्या आजही कागदावरच आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments