Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवस्मारकाच्या कामाला तीन वर्ष लागणार!

शिवस्मारकाच्या कामाला तीन वर्ष लागणार!

Shiv Smarak,Mumbaiमुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवस्मारकासोबतच इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवस्मारकारचे तीन वर्षात काम पूर्ण केले जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपला चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांच्या पोतडीतून रोजगार, जलसंपदा, सिंचन विहरी, मागेल त्याला शेततळीसारख्या अनेक गोष्टींसाठी तरतूद कऱण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत पाच हजार गावं टंचाईमुक्त करण्याचं उद्दिष्ट असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मुंबईलगत अरबी समुद्रात असलेली शिवस्मारकासाठीची जागा राजभवनापासून १.२ किमी, गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी तर नरिमन पॉर्इंटपासून २.६ किमी समुद्रात आहे. समुद्रातील ६.८ हेल्टरच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचे काम लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीकडे सोपविण्यात आले असून येत्या ३६ महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात  विधान परिषदेत दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments