Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेच्या ‘केम छो वरळी’ गुजराती पोस्टरवरून गोंधळ !

शिवसेनेच्या ‘केम छो वरळी’ गुजराती पोस्टरवरून गोंधळ !


मुंबई : मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांवर डोळा ठेवून शिवसेनेने युवासेनेचे प्रमुख प्रमुख आदित्य ठाकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वरळीतून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे. गुजराती मतांवर डोळा ठेवून शिवसेनेने पोस्टरबाजीची सुरुवात केली आहे. वरळीतील प्रत्येक चौकात ‘नमस्ते वरळी’ तसेच ‘केम छो वरळी’ असं गुजराती भाषेतील पोस्टर लावण्यात आले आहे. यावरून सोशल मीडियावरून गोंधळ उडाला आहे.

 मराठी माणसाच्या नावावर राजकीय दुकानदारी चालवणा-या शिवसेनेला मराठी मतांची गरज नाही का? अशा प्रतिक्तिया सोशल मीडियामध्ये उमटत आहे. शिवसेना या पोस्टरच्या माध्यमातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चाही केली जात आहे.  मराठी माणासाच्या न्याय, हक्कांसाठी लढणारी सेना म्हणजे शिवसेना, अशी शिवसेनेची ओळख आहे. पण गुजराती भाषेत लावलेल्या या पोस्टरचा फोटो व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे.

सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आदित्य ठाकरे यांना ट्रोल केले जात आहे. केम छो वरळी या पोस्टरचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी या गुजराती पोस्टरवरुन शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट केले. लोकसभेला शिवसेनेने दक्षिण मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा प्रचार करताना वरळी, भायखळा, लालबाग, चिंचपोकळी विभागात ‘मी मराठी माझा खासदार मराठी’ असा प्रचार केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकेरेंच्या गुजराती पोस्टरचे फोटो व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेच्या प्रचारावरही अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, मराठी मतदारांना हे काही पचणी पडतांना सध्या तरी दिसून येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments