Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईधक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिका-याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिका-याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

मुंबई: शिवसेना पुरस्कृत शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील महिलेने महेश्वरी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेला पक्षात पद देऊन तिला सतत कार्यलयात बोलावून तिच्यासोबत विनयभंग केला जात होता, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे.

या त्रासाला कंटाळून तिने चेंबूर पोलिसांत महेश्वरी यांच्याविरोधात तक्रार दाखली केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी करत आहेत. दीपक महेश्वरी यांची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी चेंबूर येथे आपले कार्यालय सुरु केले. त्यानंतर दीपक यांची तक्रारदार महिलेसोबत ओळख झाली. ओळखीनंतर महिलेचीही महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर महिलेला विनाकारण कार्यालयात बोलावून सतत विनयभंग करत होते. त्यामुळे महिलेने कार्यालयात जाणे बंद केले. महिलेने कार्यालायत येणे बंद केल्यामुळे महेश्वरीने जीवे मारण्याची धमकी दिली असा दावा तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे.

महेश्वरी यांनी जून महिन्यात महिलेला पक्षाच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे, असं सांगून तिला गाडीत बसवून मानखूर्द येथील रहदारी नसलेल्या जागेवर घेऊन गेले . तिथे गेल्यानंतर महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने विरोध करत गाडीतून उतरत थेट रिक्षा पकडली आणि घर गाठलं. यानंतर दीपकने फोन करुन पक्षात काम करायचे नाही असं स्पष्ट सांगितलं.

महिलेने पक्षात काम करण्यासाठी नकार दिल्यानंतर महिलेला शरीरसंबध ठेवण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत होता. पण महिलेकडून स्पष्ट नकार येत असल्यामुळे आरोपी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असे. असा आरोप महिलेने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments