Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईतील सिध्दविनायक मंदिर बंद

मुंबईतील सिध्दविनायक मंदिर बंद

Siddivinayak_Temple_MUMBAI, coronavirus, siddhivinayak temple, corona, temple, temple effect from coronaमुंबई : मुंबईतील सिध्दविनायक मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आला आहे. अशी माहिती सिध्दविनायक मंदिर ट्रस्ट प्रशासनातर्फे माध्यमांना देण्यात आली आहे. दरम्यान ट्रस्टचे वैद्यकीय कक्ष सुरु राहणार आहेत. अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

  • पुणे – १६
  • नागपूर – ४
  • यवतमाळ – ४
  • ठाणे – १
  • अहमदनगर – १
  • कल्याण ३
  • पनवेल – १
  • नवी मुंबई – १
  • मुंबई – ८
  • नवी मुंबई- १
  • औरंगाबाद – १

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments